आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधकांनी शोध घेण्याचे डॉ. सिंग यांचे आवाहन:स्थापत्यावरून लेण्यांचा कालखंड ठरू शकेल का?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामधील लेण्या व त्याचा कालसुसंगत आढावा आतापर्यंत घेण्यात आला नाही. त्यामुळे भारतीय लेण्यांचा कालखंड निश्चित करणे हे अवघड झाले आहे. स्थापत्यावरून लेणींचा कालखंड निश्चित करता येईल का, याचा शोध संशोधकांनी घेतला पाहिजे, असे मत इतिहास संशोधक डॉ. राजेश सिंग यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ‘शहरातील बौद्ध स्थापत्य वारसा’ या विषयावर कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते.

दुसऱ्या सत्रात लेणी अभ्यासक डॉ. संजय पाईकराव यांनी औरंगाबाद लेणीतील सोमसुत जातक शिल्प-पटावर नवा प्रकाश टाकला. त्यामध्ये त्यांनी सोमसुताच्या कालखंडातील विविध प्रसंग शिल्पपटामध्ये जी जातककथा आली आहे त्याचे वर्णन पीपीटीच्या माध्यमातून मांडले. तिसऱ्या सत्रात डॉ. वि. ल. धारूरकर यांनी मराठवाड्यातील बौद्ध धम्म याविषयी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. सचिव डॉ. बिना सेंगर यांनीही मनोगत व्यक्त केले. ५ आणि ६ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद लेणी येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सूत्रसंचालन कृष्णा काळे यांनी केले. अनिता आढागळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...