आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करा:कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडेंची मागणी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद तालुक्यातील 35 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया बाकी आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ही निवडणूक होणे अनिवार्य आहे. असे असताना बाजार समितीची निवडणूक जाहीर केली. यामुळे साडेचारशेवर मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहातील. शासन व प्रशासनाने गांभीर्याने विचार करून ताताडीने निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून केली.

एकट्या औरंगाबाद तालुक्यात एकुण 76 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यापैकी 16 संस्था कार्यरत आहे. 60 संस्थेची मुदत 1 सप्टेंबर पूर्वीच संपलेली आहे. 25 संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. मात्र, 35 संस्थांच्या निवडणूक घेणे बाकी आहे.

आदेशाचे उल्लंघन

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 6 सप्टेंबर रोजी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे पसत्तीस संस्था व त्यातील एकुण साडेचारशेवर मतदार समितीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहातील. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल. याकडे शासन व प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन बाजार समिती निवडणूक कार्यक्रम रद्द करावा व पहिले 35 संस्थाची निवडणूक प्रक्रिया राबवावी.

त्यानंतर बाजार समितीची निवडणूक घ्याव्यात, अशी मागणी पठाडे यांनी केली आहे. यावेळी श्रीराम शेळके, रामकिसन भोसले, अगाजी दांडगे, अजय पळसकर, सजनराव मते, रामभाऊ शेळके, बाबासाहेब वाघ, शिवाजीराव वाघ, भाऊसाहेब काळे, दामुअण्णा नवपुते, ज्ञानेश्वर ठोंबरे, आत्माराम पळसकर, कल्याण शेळके, शेख हाकीम, भाऊराव मुळे आदी उपस्थित होते.

प्रशासक म्हणून येण्यास धडपड

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस नवीन युतीचे सरकारन स्थापन झाले आहे. त्यामुळे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील मविआचे प्रशासक मंडळ हटवण्यात आले असून त्या ठिकाणी आता भाजप शिंदे गटाचे प्रशासक मंडळ नियुक्तीसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत.

मात्र, याला न्यायालयीन अडथळा देखील आहे. यावर मात करून प्रशासक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली का? याबाबत पठाडे यांनी विचारले असता पहिले विकासेससची निवडणूका व्हाव्यात व नंतर बाजार समितीची निवडणूक घेणे उचित ठरेल म्हणून आम्ही मागणी करत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...