आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा, पोलिस प्रशासनास खंडपीठाचे आदेश:नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करून गुन्हे नोंदवा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायलॉन मांजाची वारंवार विक्री करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांचा शॉप अॅक्ट परवाना रद्द करावा. वारंवार समज देऊनही सुधारणा होत नसेल तर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी दिले.

शहरात नायलॉन मांजामुळे २०२० मध्ये दुचाकीस्वार दांपत्याचा अपघात हाेऊन महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. डिसेंबर आणि जानेवारीत पतंगबाजीसाठी माेठ्या प्रमाणात मांजा वापरला जाताे. यामुळे अनेकांचा गळा कापला गेला असून पक्षी आणि जनावरांनाही इजा झाली आहे. मांजाची निर्मिती, त्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वी दिले होते. सुमोटो याचिका पुन्हा सुनावणीस आली असता न्यायालयाचे मित्र अॅड. सत्यजित बोरा यांनी कारवाईची मागणी केली.

यापूर्वी दंडात्मक कारवाई केली असेल आणि पुन्हा अशा प्रकारे नायलॉन मांजा विक्री करताना एखादा दुकानदार वारंवार समोर येत असेल तर त्याचा शॉप अॅक्टचा परवाना रद्द करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने करावी. एकदा समज देऊनही विक्री सुरूच असेल तर अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले.

बातम्या आणखी आहेत...