आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालार्थ आयडी रद्द करण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा:यानंतर पुन्हा कसूर केल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाईचा इशारा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी मान्यता रद्द करण्याचे आदेश करण्याच्या कार्यवाही बाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक संचालनालयाला सादर केलेला नसून त्यात हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. पुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कसूर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी या संदर्भातील पत्र विभागीय उपसंचालकांना दिले आहे. ज्यात राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. तसेच त्यात मंत्र्यांच्या मुलांची देखील नावे होती. असे समोर आले होते. त्यानंतर आता परिषदेकडून टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

माध्यमिकच्या 29 शिक्षकांची नावे

या यादीतील काही उमेदवार शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु करुन विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द करण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावर औरंगाबाद जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांमधून असलेल्या यादीत 120 तर माध्यमिकच्या 29 शिक्षकांची नावे यादीत होती.

डीएलएड आणि बीएड उमेदवारांचे लक्ष

त्यांचे वेतन शिक्षण विभागाने रोखल आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. तर प्राथमिकच्या यादीतील नावे असणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले. या पुढील प्रक्रिया काय करायची आहे.याची माहिती अथवा निर्देश जसे येतील त्याप्रमाणे केले जाईल असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. तर पुढील टीइटी बाबत काही निर्णय होईल की नाही याकडे आता डीएलएड आणि बीएड उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

टीईटी प्रमाणपत्रांची आकडेवारी

  • औरंगाबाद प्राथमिक 293, माध्यमिक 15
  • बीड प्राथमिक 85, माध्यमिक 31
  • जालना प्राथमिक 14, माध्यमिक 25
  • परभणी प्राथमिक 229, माध्यमिक 10
  • हिंगोली प्राथमिक 33, माध्यमिक 26
बातम्या आणखी आहेत...