आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 18 संचालकपदांच्या जागांसाठी 129 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात आठ जणांचे छाननी दरम्यान अर्ज बाद झाल्याने आता तब्बल 121 उमेदवार रिंगणात आहेत. हि निवडणुक 28 एप्रिलला होणार आहे.
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 20 एप्रिल असून त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यंदा प्रथमच आडूळ येथून विविध कार्यकारी सोसायटीमधून उद्धव ठाकरे गटाकडून शुभम पिवळ यांनी तर मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटातर्फे व्यापारी मतदारसंघातून शेख इलियास नूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत.
पहिल्यांदाच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आडूळ येथील उमेदवारांना पसंती दिल्याने व त्यांचीच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असल्याने आडूळ येथील राजकिय वातावरण कमालीचे तापले आहे. सहकार कायद्याचा विचार करता पक्षीय राजकारण यात नसले तरी अप्रत्यक्षरीत्या त्यात विविध पक्षांचा हस्तक्षेप असतोच त्यामुळे व राज्यातील सत्तासंघर्ष नंतर तालुक्यात शिवसेनेचे दोन गट पडल्याने व एक गट महा विकास आघाडी सोबत असल्याने आता महाविकास आघाडी, शिंदे शिवसेना व भाजप असे मतांचे ध्रुवीकरण बाजार समिती निवडणुकीत होईल असे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात पहावयास मिळते आहे.
निवडणूक चुरशीची होईल या भिती पोटी इच्छुक अर्ज दाखल करणाऱ्या इतरांना माघार घेण्यासाठी मनधरणी करीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या निवडणुकांमध्ये सहकारातील राजकारण्यांचाही चांगलाच कस जाणकार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.