आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँडल मार्च:औरंगाबाद नावासाठी कँडल मार्च; हजाराेंच्या संख्येने आबालवृद्ध सहभागी

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला. शहराचे नाव आैरंगाबादच कायम ठेवावे, अशी मागणी करत हजाराे महिला-पुरुष यात सहभागी झाले.

राज्य व केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले. याविराेधात औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी कँडल मार्च काढण्यात आला. याचे नेतृत्व महिलांनी केले. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नामांतराचा निर्णय रहिवाशांनी घ्यावा : इम्तियाज
कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना संबोधित करत खा. इम्तियाज म्हणाले, आैरंगाबादचे नाव बदलण्याचा निर्णय शहर व जिल्ह्यातील जनतेने घ्यावा. मुंबई, दिल्लीतून येणारे आदेश आम्हाला मान्य नाहीत. औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबाद होते, आहे आणि कायम राहील.

बातम्या आणखी आहेत...