आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन:महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कँडल मार्च, व्याख्यान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (६ डिसेंबर) शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. भडकल गेट, विद्यापीठ गेट, विद्यापीठ वाय पाॅइंट येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी होईल. { धम्ममय भारत मिशन आणि साकेतनगर येथील श्रावस्ती विहार यांच्या वतीने सायंकाळी ६ वाजता मिलिंद महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लावलेल्या बोधिवृक्षाचे पूजन करून कँडल मार्च काढण्यात येईल. रात्री ९ वाजता भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांची धम्मदेसना आणि पहाटे साडेचार वाजेपर्यंत महापरित्राण पाठ होईल.

{भडकल गेट येथे सायंकाळी ६ वाजता २ मिनिटांचे सामुदायिक अभिवादन करण्यात येईल. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दौलत मोरे, विजय निकाळजे, डॉ. देवदत्त म्हात्रे आणि प्रा. प्रताप कोचुरे यांनी केले आहे. {विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात सकाळी ११ वाजता साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. {विद्यापीठाचे विद्यार्थी वाय पॉइंटपासून भडकल गेटपर्यंत सकाळी ८ वाजता समता शांती पदयात्रा काढणार आहेत. { विद्यापीठ नाट्यगृह, किलेअर्कचे वसतिगृह, समर्थनगरातील संबोधी अकादमीत रक्तदान शिबिर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...