आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:शहरात 24 तर ग्रामीण भागात 16 ठिकाणी कंन्टोनमेंट झोन जाहिर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरीकांच्या हालचालीवर निर्बंध

हिंगोली शहरात २४ तर ग्रामीण भागात १६ ठिकाणी कंन्टोनमेंट झोन जाहिर करण्यात आले असून या भागातील नागरीकांच्या हालचालीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील आठवडाभरापासून रुग्णांची संख्या दिवसैं दिवस वाढत आहे. आता पर्यंत जिल्हयात रुग्णांचा आकडा ५०००च्या जवळपास पोहोचला आहे. सध्याच्या स्थितीत ४१२ रुग्णांवर उपचार केले जात आहे. तर ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांना पुरेशा प्रमाणात उपचार मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आरोग्य विभागासह इतर यंत्रणांची बैठक घेऊन आवश्‍यक सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ज्या भागात कोरोना रुग्ण सापडले त्या भागातील ५०० मिटर परिसरात कंन्टोन्मेंट झोन जाहिर केले आहेत. यामध्ये हिंगोली शहरात सराफगल्ली, रिसालाबाजार, पेन्शनपुरा, लाला लजपतराय नगर, तिरुपती नगर, रामाकृष्णा नगर, विवेकानंद नगर, सिध्दार्थ नगर, भोईपुरा, यशवंतनगर, शिवराज नगर, जिजामाता नगर, एनटीसी, रेल्वेस्टेशन रोड, शिवाजी नगर, बांगरनगर, सरस्वतीनगर, सराफा बाजार, कोमटीगल्ली, जूने पोलिस ठाणे, विद्यानगर, मस्तानशहानगर आदी प्रमुख भागांचा समावेश आहे.

या शिवाय ग्रामीण भआगात पांगरी, बळसोंड, सुराणानगर, डिग्रस कऱ्हाळे, बासंबा, उमरा, गंगानगर, आनंदनगर, भिरडा, रामाकृष्णनगर, वैजापूर, हनवतखेडा, बोराळा, डिग्रसवाणी, बोरजा, आमला या गावांचा समावेश आहे. या भागातील गावकऱ्यांनी त्यांना दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशानाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...