आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:पुणे महामार्गावर कायगावनजीक कार व पिकअपचा अपघात; एक जण ठार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कायगाव येथे चालत्या पिकअप मालवाहतूक गाडीने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी कार त्यावर धडकल्यामुळे झालेल्या अपघातात कार चालक ठार झाल्याची घटना दि. ८ रोजीरात्री साडेनऊच्या सुमारास घडली. औरंगाबादहून नगरच्या दिशेने जाणारी मालवाहतूक पिकअप गाडी क्रमांक एमएच.२० ईजी. ६०९१ ही लोखंडी अँगल घेऊन जात असताना तालुक्यातील नवीन कायगाव येथे स्टँडवर गाडी आली असता पिकअप चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यात पाठमाघून येणारी बलेनो कार क्रमांक एम.एच.२० एफ.पी. ९९९३ ही त्यावर धडकल्यामुळे गाडीची एअर बॅग फुटली. पिकअप मधील गज कार मधून शिरून पाठीमागे निघाले. स्थानिक नागरिकांनी कार चालक किशोर नानासाहेब कळसकर, राहणार गणेशवाडी ह.मु.आदिनाथ कॉलनी वाळूज ता.गंगापूर यांना औरंगाबाद घाटी दवाखान्यात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...