आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार विहिरीत पडून दोघांचा मृत्यू; जालन्याजवळील जामवाडी शिवारातील घटना, दोन मृत बीडचे

जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्याशेजारील विहिरीत कोसळलेली कार क्रेनने बाहेर काढण्यात आली

जालना ते देऊळगावराजा रोडवर जामवाडी शिवारात ब्रीझा कार (क्र. एमएच २२ एएम २७०१) विहिरीत कोसळून दाेन जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

ही कार परभणीची असून ती बीडकडून बुलडाण्याला जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. जालना ओलांडल्यानंतर कार भरधाव देऊळगावराजाकडे जात होती. अचानक ती एका वळणावरून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. एका मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरून मृताचे नाव अब्दुल मन्नान शेख सगीर (बीड) असे आहे. दुसऱ्या मृताचे नाव अझहर कुरेशी असे आहे. ही विहीर तुडुंब भरलेली असल्यामुळे कार बाहेर काढण्यात अडचणी अाल्या होत्या. अखेर क्रेन आणून रात्री उिशरा ही कार विहिरातून बाहेर काढली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.