आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकरण:हिंस्र प्राण्यांपासून ‘कार्बाइड तोफ’ करेल संरक्षण; टाकाऊ वस्तूंपासून अनोखे उपकरण

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील पिकांचे वन्यप्राणी नासधूस करतात. हिंस्र प्राणी अनेकदा शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी करतात. अनेकांना जीवही गमवावा लागताे.आता यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणारआहे. आर.पी. नाथ हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनाेखी “कार्बाइड तोफ’ बनवली असून, तिच्या आवाजामुळे शेतकऱ्यांचा जीव वाचेल तसेच प्राण्यांनाही इजा होणार नाही.

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या या प्रयोगाने गुरुवारी सर्वांचे लक्ष वेधले. औचित्य होते शिशुविकास मंदिर शाळेतआयाेजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे. प्रदर्शनात ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रकारचे समाजोपयोगी प्रयोग सादर केले. उद्घाटनप्रसंगी विस्तार अधिकारी जे.व्ही.चावरे, बाळासाहेब चोपडे, शिरसाठ यांची उपस्थिती होती.

“तंत्रज्ञान आणि खेळणी’ या संकल्पनेवर आधारित प्रयोेग विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. ज्यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, विकास आदी विषयांवर प्रयोग सादर केले. यात डॉ.आर.पी.नाथ हायस्कूलच्या अरविंद भारती, उजेफ मुजीब सय्यद, रिझवान राजू पठाण यांनी शिक्षिका स्मिता देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली कार्बाइड तोफ आकर्षणाचे केंद्र ठरली होती. अनेकांनी त्याचे कौतुक केले.

पीव्हीसी पाइप, सायकलची चाके जोडली
टाकाऊ पीव्हीसी पाइपचे पाच सेमीचे तीन तुकडे करून त्यांना जोडले. त्याला सायकलचे जुनी दोन चाके जोडली. कागदी कप, आगपेटी, पाण्याचा वापर करून “कार्बाइड तोफ’ तयार केली. तर अलमीर उर्दू प्रायमरी स्कूलच्या सातवीत शिकणाऱ्या मिर्झा अनस याने मॅथ्स मॅजिकल टॉइज हा प्रयोग सादर केला. खेळाच्या साहित्यातून आपण गणिताची भीती कशी दूर करू शकतो, गणित सोप्या पद्धतीने शिकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर सादरीकरण करता येईल.

बातम्या आणखी आहेत...