आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या काळानुसार औद्योगिक क्षेत्रातील बदलाचा परिणाम आज विद्यार्थ्यांच्या मनावर होत आहे. इंजिनिअरिंगकडे पाठ फिरवत विद्यार्थ्यांचा आता फार्मा आणि कॉमर्स क्षेत्रासह ऑटोमेशन डिजिटलायझेशन क्षेत्राकडे कल वाढत असून यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सायन्स शाखेतील एक क्षेत्र म्हणून फार्मसीकडे पाहिले जाते. नवीन औषधांची निर्मिती काळानुरूप बदलत आहे. त्यातील औषधांचे वितरण आणि इतर कामांसाठी या क्षेत्रातील पदवीधर म्हणजेच फार्मसी ग्रॅज्युएटची आवश्यकता भासत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून इंजिनिअरिंगकडे कल कमी होत जाऊन आता फार्मसी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या क्षेत्रात दिवसेंदिवस करिअरच्या संधी वाढत आहेत. फार्मासिस्ट : बी.फार्मसीकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळाच वर्ग आहे. विद्यार्थी हेल्थ सिस्टिम, हॉस्पिटल, कम्युनिटी, इंडस्ट्रियल, रिटेल आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतो. कॉर्मसकडे कल : फार्मसीप्रमाणेच यंदाही कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यात जागतिकीकरण स्तरावर पैशाचे महत्त्व वाढले आहे. अर्थाशिवाय पर्याय नसून दुसरीकडे औद्योगिक विकास वाढत आहे. जागतिक आर्थिक नियमानुसार प्रत्येक व्यापाऱ्यास आपल्या कराविषयी जाणून घेण्याची गरज असते. त्यासाठी कॉमर्सचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांनाही चांगले दिवस आले आहेत. अॉटोमेशन, डिजिटलायजेशनमध्ये बदलले कामाचे स्वरूप : औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळ विकास अधिकारी हा पूर्वी कामगार आणि कंपनीतील मालक यांच्यातील दुवा समजला जात होता. त्या काळात डिजिटलायझेशन फारसे नव्हते. ऑनलाइन डेटा संकलित करणे, कामगारांचे आरोग्य चांगले ठेवणे, इंटरनेट-व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून त्यांना नोटीस देणे अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून काम करावे लागते. त्यामुळे आता टेक्नॉलॉजीचा वापर वाढत आहे. तसेच विविध अभ्यासक्रम नवीन आल्याने ऑटोमेशनवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातही करिअरच्या अनेक संधी दहावी-बारावीनंतर उपलब्ध आहेत. करिअरच्या अनेक संधी : कॉमर्स क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. बँकिंग, शासनाच्या विविध योजनांवर काम करण्याची संधी, कंपनीत सीए, सीएस त्यासोबतच आर्थिक क्षेत्रासंबंधित खासगी संस्थांवर काम करण्यासाठी कॉमर्स शिक्षितांची गरज वाढत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.