आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा खेळावर परिणाम :ग्रामीण कुस्तीपटूंना काेरोनामुळे मोठा आर्थिक फटका, खेळात बदल होणार- प्रा. मंगेश डोंगरे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'घरीच करावे सरावाचे नियोजन'

विजय साठे

कोरोना व्हायरस या महामारीमुळे जगभरातील क्रीडा क्षेत्र ठप्प झाले आहे. जवळपास सर्व खेळातील खेळाडूंवर त्याचा परिणाम झाला. विशेष म्हणजे, कोरोनाचा देशात व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आणि सरावावर परिणाम झाला असल्याचे कुस्ती प्रशिक्षक प्रा. मंगेश डोंगरे यांनी सांगितले.

डोंगरेंनी म्हटले की, ग्रामीण भागतील मल्ल सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील आहेत. एप्रिल ते जून या महिन्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावी धार्मिक उत्सव, यात्रा असतात. त्याठिकाणी छोटे-मोठे आखाडे, दंगल आयोजित केली जाते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम, मानधन व विविध किताब खेळाडूंना मिळतात. त्या मिळालेल्या पैशावर कुस्तीपटूंचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. यंदा तो कार्यकाळ लॉकडाऊनमध्ये गेल्याने सर्व यात्रा, उत्सव रद्द झाले. त्यामुळे कुस्तीपटूंचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साहजिक त्यांच्या खुराक व भाविष्यातील नियोजनावर पाणी फेरले गेले. त्याचा परिणाम निश्चित मल्लांवर झाला आहे.

घरीच करावे सरावाचे नियोजन 

लॉकडाऊनमुळे सर्व प्रशिक्षण केंद्रे, मैदाने, आखाडे बंद आहेत. मल्लांनी घरीच पारंपरिक पद्धतीने व्यायाम करायला हवा. त्यासोबत नियमित सपाट्या, जोर-दंड बैठका, दोरी उड्या, वैयक्तिक डाव, तंत्र, ढील, शॅडो सराव करावा. आपल्या प्रशिक्षकाकडून सरावाचे नियोजन करून घ्यायला हवे. त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. आपले व्हिडिओ बनवून प्रशिक्षकांना पाठवावे, त्यातील चुका टाळ्याव्यात, असे प्रा. डोंगरे यांनी म्हटले.

खेळात बदल होईल 

कुस्ती हा शरीराला स्पर्श करून खेळला जाणारा खेळ आहे. कोरोनामुळे आगामी काळात या खेळात बरेच बदल दिसून येतील. सरावात देखील नवीन गोष्टी दिसतील. सरकार ज्या काही सूचना व निर्देश जाहीर करतील, त्याचे पालन करावे लागेल. त्याची सर्व जण प्रतीक्षा करत आहेत. या महामारीतून प्रत्येकाने आपला बचाव करणे महत्त्वाचे आहे. खेळ व व्यायायामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. प्रत्येकाने घरी नियमित व्यायाम करा, असे आवाहन प्रा. डोंगरे यांनी केले.

0