आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:केजमध्ये भाजपच्या 35 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, आंदोलनावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन  

केजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी मुंदडा यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना पिककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी नुकसान भरपाई देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, गत हंगामात सोयाबीनचे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या उर्वरित गावाचे शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली केज तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दोन तास धरणे आंदोलन केेले. मात्र आंदोलनकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले केले नाही. अशी तक्रार गुप्तचर शाखेचे पोकॉ मतीन इब्राहीम शेख यांनी दिल्यावरून भगवान केदार, नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, विजयकांत मुंडे, विष्णु घुले, सुनील घोळवे, अंगद मुळे, शरद इंगळे, राहुल गदळे, सुरेश आंधळे, गोरख गीते, संदीप पाटील, शिवदास थळकरी, कैलास जाधव, अनिरुद्ध शिंदे, संतोष देशमुख, बिभीषण भोसले, अविनाश साबळे, संतोष जाधव, रामराजे तांबडे, सुरेश घोळवे, अतुल इंगळे, खदीर कुरेशी, अर्जुन बनसोडे, विक्रम डोईफोडे, शशीकांत थोरात,  काकासाहेब पाळवदे, पांडुरंग भांगे, धनराज साखरे, वैजनाथ तांदळे, विठ्ठल पारखे, शिवाजी भिसे, अंकुश जोगदंड, प्रकाश मुंडे, प्रकाश बाळमे यांच्याविरुद्ध केज पोलिसात कलम १८८, २६९, २७०, ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १७, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...