आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदेशाचे उल्लंंघन:दसरा मेळाव्याला गर्दी जमवल्याप्रकरणी पंकजा मुंडे, महादेव जानकर आणि भागवत कराड यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे व इतर 50 जणांवर रविवारी रात्री पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या दसरा मेळावा मागील दाेन वर्षांपासून घेतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळाव ऑनलाइन झाला. पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातून समर्थकांना संबोधित केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत असे असताना सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक जमले हाेते.

यामुळे, अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पंकजा मुंडे, खा. भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटाेदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर ५० जणंािवरोधात गुन्हा नोंद केला.जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांनी या प्रकरणी तक्रार दिली.

या कलमान्वये गुन्हे नोंद

कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser