आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:5 हजाराची लाच मागणाच्या घोटा येथील तलाठ्यावर हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • फेरफार करून देण्यासाठी मागितली लाच

हिंगोल तालुक्यातील केसापूर येथे शेत जमीनीचा फेरफार घेऊन सातबारा देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या घोटा सज्जाचा तलाठ अनिल गवई याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २८) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच तलाठ्याने सन २०१२ मध्ये सेनगाव तालुक्यात कार्यरत असतांना लाच घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली  तालुक्यातील घोटा सज्जाचे तलाठी अनिल गवई हे कार्यरत आहेत. घोटा सज्जा अंतर्गत केसापूर हे गाव येते. या ठिकाणी एका तक्रारदाराने त्याच्या आई व बहिणीचा शेतीवर हक्कसोड घेऊन त्याचा फेर करून सातबारा देण्याच मागणी केली होती. मात्र त्यासाठी तलाठी गवई याने सात हजार रुपयांची मागणी केली. मात्र ५ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पडताळणी झाली. तसेच लाचलुचपतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बुरकुले, जमादार विजय उपरे, संतोष दुमाने, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, अभिमन्यु कांदे, तानाजी मुंडे, अविनाश किर्तनकार, प्रमोद थोरात यांच्या पथकाने गुरुवारी ता. २८ सापळा रचला होता. मात्र तलाठी गवई यास शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर रात्री उशीरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तलाठी अनिल गवई यास सेनगाव तालुक्यात कार्यरत असतांना सन २०१२ मध्ये  लाच घेतांना पकडले होते. सदर प्रकरण अद्यापही न्याय प्रविष्ट आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांना लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला असल्याचे लाचलुचपतच्या पथकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...