आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका विवाहितेला धमकावून ब्लॅकमेल करत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने अत्याचार असह्य झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुख्तार खान ऊर्फ बब्बू (४२, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल) याच्यावर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ३३ वर्षीय तक्रारदार महिला विवाहित असून पती, मुलांसह सिटी चौक परिसरात वास्तव्यास आहे. गृहिणी असलेल्या विवाहितेला मुख्तार आधीपासून ओळखत होता.
तिचा सतत पाठलाग करणे, ती दिसताच अश्लील चाळे करण्याचे प्रकार तो सातत्याने करत होता. परिसरातून एकटी जात असताना काही दिवसांपूर्वी त्याने तिच्या पती व मुलांचे अपहरण करून मारण्याची धमकी दिली. शिवाय संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत भेटण्यासाठी आग्रह सुरू केला.
मार्च महिन्यात विवाहितेला घरी बोलावून तिचे मोबाइलमध्ये शूटिंग केले. तिच्यावर अत्याचार करत त्याचेही चित्रीकरण केले. त्यानंतर कोणाला सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे सुरू केले. त्याचा त्रास असह्य झाल्यावर महिलेने थेट पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गुन्हा दाखल होताच झाला पसार, कार्यालयही बंद
आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच मुख्तार खान पसार झाला. तपास अधिकारी मुक्तेश्वर लाड यांनी त्याचे घर, कार्यालय तपासले. मात्र, तो अाढळून आला नाही. त्याच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे बोर्ड पोलिसांना दिसून आले. दरम्यान, महिलेची मेडिकल तपासणी झाली असून लवकरच मुख्तारला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.