आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:विज्ञान संस्थेचे सीसीटीव्ही दुरुस्तीचा प्रस्ताव

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएचडीची तयारी करणाऱ्या एका संशोधकाने शासकीय विज्ञान संस्थेत स्वत:सह त्याच्या संशोधक मैत्रिणीला पेट्रोल टाकून जाळल्याचे प्रकरण नुकतेच शहरात घडले. या प्रकारामुळे शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तर सुरक्षेसाठी प्रत्येक महाविद्यालयात सीसीटीव्ही असणे अनिवार्य करण्यात आले असताना या शासकीय संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. इमारतीत एकूण १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु हे कॅमेरे बाहेरच्या भागात असून, हॉल अथवा केबिनमध्ये एकही सीसीटीव्ही नाहीत. अडॉप्टर खराब झाल्याने हे कॅमेरे बंद आहेत. ते दुुरुस्त करण्यासाठी इस्टेट, पुणे ऑफिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालयास कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...