आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आैरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अशा एकूण ४५७१ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, ते केवळ बसवू नये तर कार्यान्वित असले पाहिजेत, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. या सूचनेचे जिल्ह्यातील १६६५ शाळांनी पालन करत सीसीटीव्ही बसवले, तर २९०६ शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे २९०६ शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा शिक्षण िवभागाने दिलेल्या आकडेवारीवरून रामभराेसे असल्याचे दिसून येते.
शिक्षक, भौतिक सुविधांबरोबरच शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समधील नियमानुसार सीसीटीव्ही अनिवार्य केले आहे. या सर्व सुविधांची शाळांनी पूर्तता केल्यानंतर शिक्षण विभागाकडून मान्यता दिली जाते. मात्र, सीसीटीव्ही अनिवार्य असतानाही शाळांकडून हा नियम पायदळी तुडवला जात आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये काही विचित्र घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेबाबत काळजी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे शाळांमधील मुख्याध्यापक गांभीर्यांने घेत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अशा एकूण ४५७१ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे ९ लाख ५१ हजार ४६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष प्रत्येक वेळी कारवाई करणे शक्य नाही. परंतु, शाळांनी नियम पाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची आहे. सीएसआर, ग्रामपंचायत, एनजीओंच्या माध्यमातून शाळा सीसीटीव्ही बसवू शकतात. तशा सूचना शाळांना दिल्या आहेत. शाळाभेटीदरम्यान सीसीटीव्हीबाबत चाैकशी केली जाते, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.