आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शहराच्या सौंदर्याचे नुकसान होणार नाही अशी शिवजयंती साजरी करा : डिडोरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ तारखेला साजरी होणार आहे. जी-२० निमित्त शहरात परदेशी पाहुणे येणार आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन जयंती साजरी करावी, असे आवाहन नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक बबन डिडोरे यांनी केले. नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीची बैठक नुकतीच गजानन महाराज भवन या ठिकाणी पार पाडली. या वेळी सहकारमंत्री अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, संस्थापक अध्यक्ष डिडोरे यांची उपस्थिती होती. शासनाने सर्व निर्बंध उठवले असून शिवजयंती उत्साहात साजरी करा, असे आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...