आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल साेहळा:यंदा ‘दिव्य मराठी’साेबत साजराकरा डिजिटल आषाढी साेहळा, divyamarathi.com आणि अ‍ॅप वर पंढरीतील महापूजेचे घरबसल्या दर्शन

अाैरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकारांचे दिवसभर कार्यक्रम

टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी, पालखीसाेबत वारीत चालताना आलेला शिणवटा घालवण्यासाठी देहभान विसरून करण्यात येणारे गाेल-उभे रिंगण आणि पंढरीत जाऊन विठूरायाचे सावळे रूप डाेळ्यांत साठवणे म्हणजे आषाढीची वारी. दरवर्षी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक या साेहळ्यासाठी पंढरपुरात येत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तिरी अलाेट जनसागर उसळण्याची शेकडाे वर्षांची परंपरा अाहे. मात्र, यंदा ‘काेराेना’च्या पार्श्वभूमीवर पंढरीत ना वारकऱ्यांची मांदियाळी असेल ना चंद्रभागा तिरी अलाेट गर्दी.... असे असले तरी वारकरी व विठ्ठल भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. जगभरातील या विठ्ठल भक्तांसाठी दैनिक दिव्य मराठी १ जुलै राेजी साजरा करत आहे आगळा वेगळा डिजिटल आषाढी महाेत्सव...

श्री क्षेत्र पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त यंदाही ३० जून राेजी मध्यरात्री ११.३० ते पहाटे १.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाच्या महापूजेचा साेहळा हाेणार अाहे. ‘दिव्य मराठी’च्या वेबसाइटवरून जगभरातील भाविकांना घरबसल्या हा साेहळा पाहण्याची संधी मिळणार अाहे. इतकेच नव्हे तर १ जुलै राेजी पहाटे ६ वाजेपासून ते दिवसभर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व प्रवचनकारांना ऐकण्याची संधीही मिळणार अाहे. जास्तीत जास्त भाविकांनी divyamarathi.com ‘दिव्य मराठी डाॅट काॅम’ या वेबसाइटवर व अॅपवर १ जुलै राेजी पहाटेपासून या डिजिटल आषाढी साेहळ्यात सहभागी व्हावे.

या मान्यवरांचे कीर्तन, प्रवचन

उस्मानाबाद : अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाेधले महाराज, आणि भारत काेकाटे महाराज,

पंढरपूर : राणा महाराज वासकर, नामदास महाराज
मुंबई : शामसुंदर महाराज साेन्नर

जळगाव : रवींद्र महाराज हरणे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर

बीड : एकनाथ महाराज गाडे (चकलांबा), ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड),

नाशिक : अॅड. भाऊसाहेब गंभीरे महाराज,

परभणी : माधवबुवा अाजेगावकर धर्माधिकारी,

हिंगाेली : दादा महाराज डिग्रसकर (डिग्रस कऱ्हाळे),

बुलडाणा : गणेश महाराज हरणे, पुंजाजी महाराज, कृष्णा महाराज, श्रीहरीचैतन्यानंद सरस्वती महाराज, पळसखेड

मुक्ताईनगर : विशाल खाेले महाराज

पुणे : बालकीर्तनकार मुक्ताई महाराज, मानस व श्रेयस बडवे (दांपत्य),

वैजापूर : रामगिरी महाराज (सराला बेट),

नागपूर : मृण्मयी कुलकर्णी, अकाेला : अविनाश महाराज परळीकर.

आणखी बातम्या वाचण्यासाठी इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप - 

https://divya-m.in/download

बातम्या आणखी आहेत...