आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा व स्मार्ट सिटीतर्फे खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा दुसरा वर्धापन दिन बुधवारी छावणी येथील लोखंडी पूल येथे साजरा केला. यानिमित्ताने खाम नदीच्या काठावर विविध कार्यक्रम झाले.या वेळी आर्मी स्टेशन कमांडर के. एस. नारायणन, मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव, मनपा सहायक आयुक्त असदुल्लाह खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी एंड्रेस हाऊजर, उद्यान शालिनी फेलोशिप, शासकीय आयटीआय, सात महाराष्ट्रीयन बटालियन आंबेडकर कॉलेज, होलिक्रॉस, मौलाना आझाद कॉलेज, विवेकानंद कॉलेज, औरंगाबाद प्लॉगर्स व मातोश्री वृद्धाश्रमच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छता अभियान राबवले. मान्यवरांचा हस्ते अमर शहीद उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. एनओबी रॉक बँडने खाम नदीवर तयार केलेल्या गाण्याचे सादरीकरण केले.
आमदार-खासदारांची नावे, वर्धापन दिनास मात्र गैरहजेरी खाम इको पार्ककडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, यासाठी उद्यानांना आमदार-खासदारांची नावे दिली होती. येथे दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवली. मात्र कधीही हे आमदार-खासदार आले नाहीत. या आमदारांनी नाव काढून टाका, असे पत्र दिले होते, मात्र तरीदेखील नावे तशीच आहेत. तत्कालीन भाजप शहराध्यक्ष केणेकर यांनी आंदोलन केले. मात्र, कालांतराने ते थंड झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.