आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाेगत व्यक्त:विविध शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अनेक शाळांमध्ये मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करून शाळेत हजेरी लावली हाेती.फाेस्टर डेव्हलपमेंट प्राथमिक शाळा : फाेस्टर डेव्हलपमेंट शाळेचे मुख्याध्यापक जी.एस. मैद यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मुलांनी भाषणे आणि विविध गीते सादर केली. एस.एन.किटे यांनी मनाेगत व्यक्त केले. नाडे यांनी सूत्रसंचालन केले. गुल्हाने यांनी आभार मानले.

ज्ञानधारा प्राथमिक, माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय : देवळाई परिसरातील ज्ञानधारा शाळेत सावित्रीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी भित्तिपत्रक स्पर्धा घेण्यात आली. या वेळी धारेश्वर शिक्षण संस्थेच्या सहसंचालिका रीना पाटील, प्राचार्य महेश पाटील आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...