आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वरुड काजी ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचा दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, मराठवाड्यातील एकमेव ग्रामपंचायत

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील वरुड काजी ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारी वरुडकाजी ग्रामपंचायत मराठवाड्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. या पुरस्काराची घोषणा केंद्र शासनाने मंगळवारी (ता. १६) केली आहे.

केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्यावतीने दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार दिला जातो यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याबाबत विविध निकष ठेवण्यात आले आहेत यांनी कशाची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासना कडून पथकेही पाठवण्यात आली होती.

दरम्यान ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या निकषामध्ये संबंधित ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ग्रामसभा, त्यामध्ये होणाऱ्या चर्चा व अंमलबजावणी, दस्तऐवज अद्यावतीकरण, ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग, शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांची निवड, विकासकामांना मंजुरी तसेच ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा यासह इतर बाबींचा समावेश होता.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत चा तपासणीसाठी अमरावती येथील पथक दाखल झाले होते राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर केंद्र शासनाने राज्यातील  जिल्हा  परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये राज्यातील १२ ग्रामपंचायती असून मराठवाड्यातून हिंगोली जिल्हयातील वरुडकाजी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकष पूर्ण करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गटविकास अधिकारी  मिलिंद पोहरे, सहाय्यक गट विकास अधिकारी गणेश बोथीकर विस्तार अधिकारी  विष्णू भोजे यांच्या पथकाने पुढाकार घेतला होता. ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दाताळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

सातारा जिल्हा परिषदेला पुरस्कार

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या या पुरस्कारांमध्ये राज्यात सातारा जिल्हा परिषद तसेच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व कोर्ची पंचायत समितीला पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायत मध्ये नागपूर जिल्ह्यातील ब्राह्मणी,  नाशिक जिल्ह्यातील ओढा, कोमटगांव, चंद्रपूर जिल्ह्यातील जुग्नाला, आष्टा . सातारा जिल्ह्यातील खटाव, इंजाभव, भंडारा जिल्ह्यातील नेरी, अमरावती जिल्ह्यातील परसापुर, वर्धा जिल्ह्यातील नांदुरी सांगली जिल्ह्यातील तडसर, ठाणे जिल्ह्यातील धसई, पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी तर हिंगोली जिल्ह्यातील वरुड काजी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...