आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाची आत्महत्या:पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
संजय योगाजी खंदारे (28)  - Divya Marathi
संजय योगाजी खंदारे (28) 
  • दुपारी एक वाजता दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. 3 दुपारी एक वाजता घडली आहे. संजय योगाजी खंदारे (28) असे या जवानाचे नांव असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील संजय योगाजी खंदारे हे मागील चार वर्षापुर्वी केंद्रीय राखीव दलामध्ये रुजू झाले होते. सध्या ते जम्मू काश्‍मीर भागातील कुपवाडा येथे कर्तव्यावर होते. मागील सात दिवसांपुर्वीच ते गावी एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. आज सकाळी घरून शेतात गेले त्या ठिकाणी जेवण केले. त्यानंतर दुपारी एक वाजता दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, त्यांच्या शेजारी असलेल्या शेतात नांगरणीचे काम सुरु होते. त्या ठिकाणी असलेले काही शेतकरी विहीरीवर पाणी पिण्यासाठी आले असता त्यांना संजय खंदारे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार प्रविण राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत खंदारे यांच्या पश्‍च्यात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...