आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नुकसानीची पाहणी:औरंगाबादसह उस्मानाबादेत आज केंद्रीय पथकाची पाहणी, निपाणी येथे पथकाची पाहणीला सुरुवात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिवृष्टीग्रस्त 15 गावांत सहा अधिकाऱ्यांचा दौरा

केंद्र शासनाच्या सहा अधिकाऱ्यांचे पथक रविवारी शहरात दाखल झाले. या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात सादरीकरण करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील 8 आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 गावांमध्ये दोन पथकांच्या माध्यमातून पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी या गावात पथक पाहणी करत आहे. निपाणी या गावातून केंद्रीय पथकाच्या पहाणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

निपाणी गावातील शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक
निपाणी गावातील शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक 26 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी मिळावा यासाठी एनडीआरएफचे पथक राज्यात नुकसानीची पाहणी करणार आहे. रमेश गंता यांच्या नेतृत्वाखाली आर. बी. कौल, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यश पाल, आर. पी. सिंग, तुषार व्यास, एम. एस. सहारे यांच्या उपस्थितीत पाहणी केली जाणार आहे.

निपाणी या गावातून केंद्रीय पथकाच्या पहाणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
निपाणी या गावातून केंद्रीय पथकाच्या पहाणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

या गावांत हाेणार पाहणी

सोमवारी सकाळी साडेआठ वाजता या पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यामध्ये एक पथक उस्मानाबाद, तर एक पथक औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी, पिंपळगाव, पैठण तालुक्यातील गाझीपूर निलजगाव, शेकटा, गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरगाव, वारखेड या गावात एक पथक जाईल, तर उस्मानाबाद जिल्ह्यात केशगाव, पाटोदा, लोहारा तालुक्यातील सास्तूर, राजेगाव, तुळजापूर तालुक्यातील कक्रांबा, अपसिंगा, कत्री या गावात दुसरे पथक पाहणी करणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser