आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सार्वजनीक विहिरीच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शुक्रवारी (ता. १२) सकाळी पाहणी केली. विहीरीला मुबलक पाणी असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच ग्रामसेवकांनीही मुख्यालयी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सार्वजनीक विहिरींची कामे केली जात आहे. काही ठिकाणी हि कामे पूर्ण होऊन गावाला पाणी पुरवठा देखील करण्यात आला आहे. तर काही विहिरींची कामे अद्यापही सुरु आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गावांना भेटी देण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, आज शर्मा यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा, वडद, वांझोळा या गावांना भेटी देऊन तेथील विहिरींची पाहणी केली. अर्धा किलोमिटर अंतरापर्यंत चिखल तुडवत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विहिरीच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मिलींद पोहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश डुकरे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, संजय खंदारे, श्री. डुकरे यांची उपस्थिती होती. तीनही ठिकाणी विहिरींना मुलबक पाणी असल्याचे पाहून शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी वांझोळा येथे घनदाट जंगल या उपक्रमाला भेट दिली तर गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
कोरोनाला हरविण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे ः राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली
राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. आरोग्य विभागाचे सर्व पथक कामाला लागले आहे. गावकऱ्यांनीही घराबाहेर न पडता घरातच थांबून कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.