आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:औरंगाबादच्या चाैघी आजपासून उतरणार ज्युदाे लीगच्या मैदानात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने मेहसाना (गुजरात) येथे ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या पहिल्या महिला ज्युदो लीग व रँकिंग स्पर्धेसाठी औरंगाबादच्या चौघींची निवड झाली आहे. यात जिल्हा ज्युदो संघटनच्या उत्कर्षा करंगुले, स्वरदा बामनोदकर, तन्मयी शिराढोणकर आणि शतावरी जोशी यांचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षक विश्वास जोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, शहर ज्युदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय दंडे, उपाध्यक्ष भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, महेश सहस्रबुद्धे, प्रसन्न पटवर्धन, दत्ता आफळे, डीएसओ चंद्रशेखर घुगे, जिल्हा सचिव अतुल बामनोदकर, अजय देशपांडे, कांचन देशपांडे, विश्वजित भावे, संजय परळीकर, शरद पवार आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...