आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव्हारा आम्ही 50 जणांनी सांभाळला:शहाजी पाटलांची ठाकरेंवर टीका; गर्दी पाहण्यासाठी खैरे अन् दानवेंना कोपऱ्यात खुर्ची द्यायला हवी होती

पैठण23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव्हारा आम्ही 50 जणांनी टाळला. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंसाठी कोपऱ्यात खुर्च्या ठेवायला हव्या होत्या. मग त्या दोघांना कळले असते की, भुमरेंची आणि शिंदेंची ताकद काय, असा टोला सोमवारी आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला. ते पैठणमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते. ​​​​​​

विकासाचे राजकारण करू द्या...

शहाजीबापू म्हणाले की, आनंद दिघेंनी तयार केलेल्या आमचा देव्हाऱ्यात पहिले नार्वेकर, देसाई, सावंत असे लोक बसले होते. मात्र, देव्हारा हालायला लागला की हे सर्व बाहेर पडले आणि आम्ही सर्वांनी मिळून शिंदेंना मदत केली. आता तरी उद्धव ठाकरेंनी शांतपणे विकासाचे राजकारण करू द्यावे, असा टोलाही शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले शहाजी पाटील?

शहाजी पाटील म्हणाले की, 2019 मध्ये सर्व काही ठीक सुरू होते. 180 जागा युतीच्या आणि अपक्षसोबत असणाऱ्या आमदाराच्या आल्या. मात्र, मुंबईत बोलवत ज्यांच्याविरोधात कायम काम केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने आम्ही शांत बसलो. मात्र, तरीही आम्हाला मतदारसंघासाठी निधी मिळाला नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडे गेलो, तर निधी मिळत नव्हता म्हणून मग आम्ही शिंदेंना सुरतला घेऊन गेलो.

400 कोटींचा निधी दिला

शहाजीबापू म्हणाले की, मुख्यमंत्री राज्याच्या कारभार करत असताना आई, बहिणीच्या मुलांची काळजी करतो, असे नेतृत्व महाराष्ट्रात पाहायला मिळाला नाही. असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंचे कौतुक आमदार शहाजी पाटील यांनी केले आहेे. जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काम सुरू केले आहे. माझ्या मतदारसंघासाठी 400 कोटींचा निधी दिला, तर विरोधक केवळ भावनिक राजकारण करू पाहताय, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.

राऊतांवर टीकास्त्र

संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत शहाजी पाटलांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आमच्यावर उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी टीका केली. मात्र ते आमचे नेते बाळासाहेबांच्या घरातील आहेत. त्यांनी केलेल्या टीकेवर आम्ही काही म्हणणार नाही. मात्र, संजय राऊत हे कोकणातून उठून आले असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र डागले.

बातम्या आणखी आहेत...