आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन सोहळा:साईबाबांच्या चैतन्य पादुका पालखीचे शहरात स्वागत ; 7 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साईबाबा यांचे जन्मगाव पाथरी येथून साईबाबांच्या दिव्य चैतन्य पादुका औरंगाबाद शहरात दर्शनासाठी आल्या असून ७ नोव्हेंबरपर्यंत हा चैतन्य पादुका दर्शन सोहळा भक्तांसाठी शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या चैतन्य पादुका पालखीचे आगमन अथर्व बिल्डरचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांच्या फोर्टी ग्रीन निवासस्थानी झाले. जैन यांनी या पालखीचे जोरदार स्वागत केले.

या वेळी चैतन्य पादुका पालखी दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. दर्शन सोहळ्यानंतर जैन परिवारातर्फे भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, मनोज जैन, सपना जैन, विमला जैन, रवींद्र जैन, मानसी जैन, प्रवीण पटेल, रिटा पटेल, पुष्पा राणा, बंटी जैस्वाल, सुनील मोरे, सुधीर जोशी, अनिल राठोड, विकास वाघमारे, संजय भुसारी, दिलीप भंगाळे, जयश्री भंगाळे, रतन राऊत, मंगल राऊत, साक्षी राऊत, नितीन दामले, अनिल रोटे, अशोक कवडे यांच्यासह फोर्टी ग्रीन सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...