आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:कोरोना लस लक्ष्यपूर्तीचे जिल्हा परिषदेसमोर आव्हान

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने खबरदारी म्हणून लक्षणे दिसत असल्यास प्राथमिक केंद्रांमध्ये जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच लसीकरणावर भर देण्यात आला आहे.

मात्र सुरुवातीपासून वारंवार सांगूनही लोक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रतिसाद देत नाहीत. तर, गर्भवती आणि स्तनदा माता यांच्या लसीकरणासाठी ठेवण्यात आलेले लक्ष्य आरोग्य विभागाला पार करता आलेले नाही. यामुळे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मोठी दमछाक होत असल्याचे खुद्द आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ५२ हजार २०२ पैकी फक्त १२ हजार ७७३ गर्भवती महिलांनीच कोरोना लसीचा पहिला तर ५ हजार ६५२ महिलांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गर्भवती महिला आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु लस घेण्याबाबत अनेक समज अजूनही कायम आहेत. बाळाला काही होणार तर नाही ना? या समजुतीमुळे अजूनही हवा तसा प्रतिसाद लसीकरणाला मिळत नसलन्याचे चित्र दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...