आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामास्टर्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित २५ वर्षे वयोगटावरील मास्टर्स ट्रॉफी २०२३ बास्केटबॉल स्पर्धेत अत्यंत रोमांचक अंतिम लढतीत चॅम्पियन्स संघाने शहर पोलिस संघाला अवघ्या एका गुणाने हरवत विजेतेपद पटकावले. शहर पोलिस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम गवळी याला गौरवण्यात आले.
स्वर्गीय प्रभाकरजी पांडे क्रीडांगण विद्युत कॉलनी, बेगमपुरा येथे झालेल्या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला ७७७७ रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला चषक व ४४४४ रुपये बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल झळके पाटील, आदित्य दहिवाळ, कुंदन रेड्डी, रोमी छाबडा यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे आयोजन मास्टर्सच्या प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, संदीप ढंगारे आदींनी केले होते.
सनी, महेश, शुभम चमकले फायनलमध्ये चॅम्पियन संघाने शहर पोलिस संघावर ६९ विरुद्ध ६८ अशा एका पॉइंटने विजय मिळवला. तिसऱ्या सत्रापर्यंत शहर पोलिस संघ आघाडीवर होता, परंतु चौथ्या सत्रामध्ये स्टॅमिनाच्या अभावी चॅम्पियन संघातील शुभम गवळी व सनी फतेलष्करने उंचीचा व ताकदीचा फायदा घेतला. महेश इंगळेने २ व संदीप ढंगारेने १ थ्री पॉइंटर मारून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. पोलिसांकडून विजय पिंपळेने एकाकी लढत दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.