आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची मल्ल विजयी:पहिलवान अहिल्या शिंदेने जिंकले सुवर्णपदक

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची महिला युवा मल्ल अहिल्या शिंदेने उत्कृष्ट कामगिरी करताना आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावे केले. बिस्किक (किर्गिस्तान) येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 49 किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात अहिल्याने यजमान किर्गिस्तानच्या वालील हिला 5-3 गुणांनी पराभूत करत प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्राचे हे चालू स्पर्धेतील पहिले पदक ठरले.

अहिल्या इंदापूर (पुणे) येथील खेळाडू आहेत. सध्या ती हरियाणा येथे कुस्तीचा सराव करते. नुकत्याच रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने संघात स्थान मिळवले होते.

अहिल्या शिंदे ही इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. नारायणदास रामदास हायस्कूलची विद्यार्थिनी असून ती इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...