आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सोमवारी औरंगाबाद, जालना, बीडसह ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चक्रीवादळामुळे एकाच दिवसात थंडीत खंड निर्माण झाला. शुक्रवारी ७.९ अंश आणि शनिवारी ७.५ अंशांपर्यंत घसरलेल्या किमान तापमानात ७.१ अंशांनी वाढ होऊन ते १४.६ अंशांवर पोहोचले.
हवामानातील बदलामुळे तापमानात कमालीचे चढ-उतार होत आहेत. अधूनमधून ढगांची गर्दी होते. दोन दिवस अतिथंडी तर चार दिवस उकाडा जाणवत आहे. या बदलणाऱ्या हवामानामुळे मानवी आरोग्याबरोबरच पिकांवरही दुष्परिणाम होत आहेत. त्यात आणखी भर म्हणजे सोमवार ते बुधवार या काळात आकाशात ढगांची गर्दी होणार आहे. वारे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची व मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी अवकाळी ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सरासरीपेक्षा तीन अंशांनी वाढ हवामानातील बदलामुळे एकाच दिवसात किमान तापमानात ७ अंशांवर वाढ झाली असली तरी त्यात सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी, कमाल तापमानात २ अंशांनी वाढ झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.