आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करा:नुकसान भरपाईही लवकर द्या; चंद्रकांत खैरेंसह शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापुर, गंगापुर तालुक्यातील जिल्हाभरात मागील आठवडयात अवकाळी वादळी वारे पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये मका, गहु, कपाशी, हरभरा, ऊस, भाजीपाला, डाळींब, मोसंबी या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मका, पिक आडवे झाले असुन पाळीव जनावरे सुध्दा दगावली आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत असुन कालपर्यंत पिकांचे पंचनामे देखील झालेले नाही. यामुळे शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत असुन या सर्व पिकांचे विनाविलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी माजी महापौर नंदकुमार घोडेले उप जिल्हाप्रमुख संजय पाटील तालुका प्रमुख पैठण मनोज पेरे कन्नड तालुका प्रमुख संजय मोटेयांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

25 हजार रुपये हेक्टरी मदत द्या

या वेळी खैरे म्हणाले की नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थीक मदत द्यावी. तसेच शेतकन्यांनी नियमीत कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर २५,०००/- प्रति हेक्टरी अनुदान वितरीत करण्यात यावे.

प्रधानमंत्री सन्मान निधी सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावा. यासाठी सर्कलनिहाय मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी यांना मेळावे घेऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी मागील वर्षी अतिवृष्टीचे शासनाने जाहीर केलेले अनुदान विनाविलंब वितरीत करावे. मागील पीक विम्याचे अनुदान सुध्दा मिळालेले नाही. ते त्वरित देण्यात यावे. जे जे पाळीव जनावरे मृत झाले त्यांचे सुध्दा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे या मागण्या केल्या.

मागील आठवड्यात ६ शेतकऱ्यांनी जिल्ह्यात शेतीनुकसानीमुळे आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे वरील विषयी तात्काळ कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...