आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाजूने निकाल लागावा अशी आई जगदंबा, स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली आहे. ते म्हणाले सत्याचा विजय होऊ दे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना अभेद्य राहू दे. असेही ते यावेळी म्हणाले.
बंडखोर आमदारांची अपात्रता आणि खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. तसेच, खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित आहे. ती सुरू करायची की नाही, याबाबत आज घटनापीठ निर्णय देण्याची शक्यता आहे.
धनुष्यबाणासहित मागण्यांना मान्यता
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 3-4 निवडणुका झाल्या. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या चिन्हावर अनेकजण निवडून आले. आता ते फुटीरवादी झाले असले तरी ते सुद्धा शिवसेना पक्षातच निवडून आले. घटनेपुढे यांना मान्यता मिळालेली नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणेच सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या धनुष्यबाणासहित इतर मागण्यांना मान्यता देईल, अशी आशा वाटत असल्याचे खैरे म्हणाल्या.
आम्ही स्वतःच्या पैशांनी जाऊ
खैरे म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 4 हजार बसेस बुक करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातही 300 बसेस बुक झाल्या आहेत. यावर चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 4 हजार बसेस बुक करायला यांच्याकडे पैसे कुठून आले? मुद्दाम शिवसेना फोडण्याचे कटकारस्थान केले जात आहे. मिळालेल्या खोक्यांमधून हे सर्व करत आहेत. आमचे शिवसैनिक म्हणतात, आम्ही स्वतःच्या पैशांनी जाऊ. आमची भाकरी खाऊ.
शिंदे-ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न
सुनावनीत आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर, सरकारच्या बाजूने निकाल आल्यास हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असणार आहे. या निकालावरच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व अवलंबून आहे. सत्तासंघर्षावरील हा निकाल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.