आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसीचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जबाबदारी घ्यावी. ओबीसीचा डाटा गोळा करताना होत असलेली अनागोंदी तत्काळ थांबवावी अशी मागणी माधवबनचे अध्यक्ष तथा निमंत्रक खुशाल मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच पंकजा मुडे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने उपहासात्मक टिका केली जाते. त्यांना राज्यसभा, विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी डावलले जात आहे. त्यामुळे त्यांनी मौन सोडण्याची गरज असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
माळी धनगर वंजारी बंजारा,नाभीक व इतर ओबोसी भटक्या विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्राचार्य खुशाल मुंडे यांनी ओबीसीची आरक्षणाबाबत महात्मा गांधी भवनात रविवारी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. इम्पेरियल डाटा हा नेमून दिलेले कर्मचारी घरी बसून, एखाद्या ठिकाणी बसून आडनाव पाहून तयार करत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
पंकजा मुंडेबाबत आकसाची भूमिका
खुशाल मुंडे म्हणाले की पंकजा मुंडे यांच्याबाबत भाजपाकडून आकसाचे राजकारण सुरु आहे. त्यांना विधानसभेत पाडण्यात भाजपच्याच लोकांचा हात होता. त्यानंतर 2019 नंतर झालेल्या विधानपरिषद, राज्यसभा, यामध्ये पंकजा मुंडेनी जरी मागणी केली नसली तरी त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्राच्या भाजपा नेतृत्वाकडून पंकजा मुंडे यांच्याबाबत आकसाची भावना दिसून येते. सध्याचे विरोधी पक्षनेते प्रदेशाध्यक्ष यांचेकडून नेहमी उपहासात्मक बोलले जाते. पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय नेते असल्याचे सांगत उपहास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसीचे विभागनिहाय मेळावे घ्यावे
मुंडे म्हणाले की पंकजा मुंडे यांनी आता मौैन सोड़णे गरजेचे आहे. त्यांनी आता विभागनिहाय ओबीसीचे मेळावे घेण्याची गरज आहे. ओबीसीचे विभागनिहाय मेळावे घेत शिवतिर्थावर शेवटचा मेळावा घेत ओबीसीची ताकद काय आहे हेदेखील दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला गुलाबराव घोळवे, रविंद्र जायभाये, डॉ मच्छिद्र गोर्डे,यांची उपस्थिती होती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.