आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलंद छावा मराठा युवा परिषद यांची आज विभागीय कार्यालय येथे सुरेश वाकडे पा. यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील संत विद्यापीठामध्ये महापुरुषांविषयी बोलताना त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य केले. याचा सर्वप्रथम निषेध व्यक्त केला. तसेच पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शैक्षणिक संस्था सुरू करताना भीक मागितली, शासनाकडे अनुदान मागितले नाही. असा उल्लेख करून एक प्रकारे महापुरुषांचा अपमानच केलेला आहे. याशिवाय आज जे शिक्षण संस्था चालवत आहेत त्यांच्यावरही निर्भसनात्मक टोला मारलेला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्या महापुरुषांनी शैक्षणिक संस्था उभ्या करताना पायपीट केली, लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि आपल्याला जमेल तेवढी मदत करा तीही दानाच्या रूपामध्ये असं ते कार्य होतं. परंतु महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्यांनी भीक मागितली असा उल्लेख करून महापुरुषांचा व त्यांच्या अनमोल कार्याचा घोर अपमान केलेला आहे. भाजप सरकारचे मंत्री, राज्यपाल, आमदारही महापुरुषांचा अपमान का करत आहेत? त्यांनी अपमान करण्याचा विडा तर उचललेला नाही ना.
मंत्र्यांनी महापुरुषांविषयी बोलताना भान न बाळगता बेताल वक्तव्य केले तर विद्यार्थी, समाज त्यांच्याकडून काय आदर्श घेतील? मंत्र्यांनी विशेषतः उच्च शिक्षण मंत्री, राज्यपाल यांनी विनम्र, आदर्शवत भाषा वापरायला हवी. शब्द जरा जपून वापरायला हवेत. मंत्री जर महापुरुषांच्या अपमान करत चालले तर पुढची पिढी या मंत्र्यांपासून काय बोध घेतील? यापुढे मंत्र्यांनी केलेले महापुरुषांचे अपमान खपवून घेतले जाणार नाहीत.
डिग्री तपासावी
चंद्रकांत पाटील यांचे डिग्रीच तपासायला हवी. ते खरोखर शिकलेले आहेत की नाहीत. असा प्रश्न आम्हाला पडतो आहे. असेही बैठकीत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा. नाहीतर पक्षश्रेष्ठीने त्यांचा व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांनी टीव्ही सेंटर येथील बुलंद छावा युवा परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या बुलंद छावाच्या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष सतीश वेताळ, प्रदेश संघटक मनोज मुळे, मराठवाडा अध्यक्ष साहेबराव मुळे, मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हाध्यक्ष प्रदीप हारदे, सदीप शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर राजगुरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव, अनिल तुपे, शिवाजी पळसकर, रतन काळे, शिवाजी भिंगारे, योगेश देशमुख, अमोल मानकापे, संदीप जाधव आदिंची उपस्थिती होती.
राज्यपालासह भाजप मंत्र्यांना युवासेना धडा शिकवणार
भाजप आणि मिंध्ये सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून राज्यपालासह भाजप मंत्र्याना सत्तेची मस्ती चढली आहे.त्यामुळे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या वाचाळवीरांना आवरा, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने युवासेना धडा शिकवणार असल्याचा इशारा युवासेनाने दिला आहे.या वक्तव्यांचा निषेध म्हणून युवासेना पश्चिम शहर युवाधिकारी आदित्य दहिवाळ यांनी शेमलेश मिनिस्टर असा फलक लावत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.