आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर निवडणूक निकालावरून टीका:चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के, त्यांनी खरंच हिमालयात जायला पाहिजे : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांतादादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू : अब्दुल सत्तार

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. मात्र महाविकास आघाडीने भाजपचे बालेकिल्ल्यांत झेंडा रोवत चार जागांवर विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत दादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु असे सत्तार यांनी म्हटले आहे. औरंगाबादध्ये ते प्रसासमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मुद्द्यावरून विरोधक त्यांना वारंवार टोमणे मारत आहेत. त्यावेळी मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते.

बातम्या आणखी आहेत...