आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्या पोलिसाकडून अडवल्या जात असल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
पालकमंत्री लोकांना दारू पाजत सुटले - चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न केले, हे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हे लोकांना दारू पाजत सुटले आहे. हे 40 गद्दार पु्न्हा निवडून येणार नाही. महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरेच प्रयत्न केले, असा हल्लाबोल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
जलील खासदार झाले अन् दंगली सुरू झाल्या
चंद्रकांत खैरे म्हणाले, आजची सभा होऊ नये यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवसेना फोडण्याचे काम फडणवीसांनी केले असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. सावरकरांना भारतरत्न देत नाही, पण त्यांच्या नावाने यात्रा काढता असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.
आजचा दिवस तुमचा असून, उद्या आमचा असेल
दरम्यान यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, पोलिसांसोबत बैठकीत शहरातील जुबली पार्कपर्यंत गाड्या सोडण्याचं ठरले होते. मात्र बाबा पेट्रोलपंपावर आठशे पेक्षा अधिक गाड्या पोलिसांनी अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सरकारच्या नादी लागून, जास्त मस्ती करू नये. आजचा दिवस तुमचा असून, उद्यापासून आमचा असेल. कारण सगळ्या गाड्या मुद्दामहून अडवले जात आहे. त्यामुळे पोलिसांना मस्ती आली असेल तर ती जिरवून दाखवू असा दम दानवे यांनी भरला. त्यामुळे अडवलेल्या गाड्या पटकन सोडा अशी मागणी देखील दानवे यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.