आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:विरोधी पक्ष एकत्र आल्यास परिवर्तन ; डॉ. कासीम रसूल इलियास यांनी व्यक्त केले मत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून एकत्र आल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडेल, असा विश्वास वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कासीम रसूल इलियास यांनी व्यक्त केला. डॉ. कासीम यांनी शहरात आयाेजित नशामुक्तीसाठीच्या एका रॅलीत सहभाग घेतला. नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांनी मजबूत आघाडी करावी. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी ते म्हणाले, यात्रेला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे काँग्रेस पक्ष मजबूत होईल. वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया देशातील समविचारी पक्षांच्या बैठकीत आघाडीसाठी प्रयत्नशील आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी दौरा सुरू आहे. आठ-दहा राज्यांत आम्ही काम करत आहाेत. काही राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमचे नगरसेवक निवडून आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...