आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांसाठी महावितरणचा नवा उपक्रम:महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल, खंडित वीज पुरवठ्यासाठी मिस कॉल सेवा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील 2 कोटी 8८ लाखांवर ग्राहकांना दर्जेदार सेवा प्रदान करण्यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांकात बदल केले आहे. त्यावरच ग्राहकांनी संपर्क साधून आपल्या समस्या प्रश्न मांडावेत असे आव्हान महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

गणेश महोत्सव सुरू आहे. नवरात्री उत्सव व दसरा दिवाळी देखील जवळ आली आहे. सध्या पाऊस पडतो आहे. पण लवकरच रब्बी हंगामाला सुरूवात होईल व विजेची मागणी वाढणार आहे. उच्च व कमी दाबामुळे आणि नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठा अचानक खंडित होतो. तसेच विविध तांत्रिक व ग्राहकांचा समस्या, प्रश्न असतात. त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी महावितरणने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, फोन सतत व्यस्त असणे, फोन न लागणे, यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. याचं भान ठेवून महावितरणने आणखी नवीन टोल फ्री क्रमांक सोमवारी जाहीर केले आहेत. त्यानुसार

नवीन नंबर १८००-२१२-३४३५ असा असणार आहे. तर पहिले १८००-२३३-३४३५ , १९१२ व १९१२० या क्रमांकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

या क्रमांकावर ग्राहक विद्युतपुरवठा खंडित वा आपत्कालीन परिस्थितीच्या तांत्रिक बिघाडाकरिता, तसेच चालू वीज दर, वीज दरातील बदल, वीज देयक विषयक तक्रारी, नवीन वीजजोडणी सारख्या वाणिज्यविषयक तक्रारींकरिता तसेच वीज चोरी, नावातील बदल, नादुरुस्त वीज मीटर बदलणे आदी तक्रारी या उपलब्ध क्रमांकावर नोंदवू शकतात.

खंडित वीज पुरवठ्यासाठी मिस कॉल सेवा

याचबरोबर महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिस कॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप आपले मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवले नाहीत; ते ग्राहक महावितरण मोबाइल ॲपद्वारे किंवा वरील टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपला ग्राहक क्रमांक सांगून आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...