आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या पाट्यांवर दोन दिवसांत ‘औरंगाबाद’ नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव लिहा, अन्यथा तीव्र आंदोलन करून हे नाव बदलण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाजवळ गुरुवारी (९ मार्च) या विषयावर शिवसेनेची बैठक झाली. या वेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, उपशहरप्रमुख राजू अहिरे, रमेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर नामांतर होऊन १५ दिवस झाले आहेत. त्यासंदर्भातील शासकीय आदेश आले आहेत तरीदेखील अनेक सरकारी कार्यालयांवर अद्याप शहराचे नाव बदलण्यात आलेले नाही. हा शासकीय आदेशाचा अवमान आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने समज देत नाव बदलण्यात येईल, असे शहरप्रमुख राजपूत यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.