आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन हजारांवर ग्राहकांची प्रचंड गैरसोय:सिडको एन-4 मध्ये वाहिनी तुटली; वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-४ सबस्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ११ केव्ही विद्युतवाहिनी तुटून खाली जमिनीवर पडली होती. सुदैवाने तेथे कुणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तुटलेली वीजवाहिनी जोडण्यासाठी महावितरणने अडीच तास वीजपुरवठा खंडित ठेवला. त्यामुळे गारखेडा परिसरातील साडेतीन हजारांवर ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली.

सकाळी हवेचा वेग चार किमी प्रतितास होता. त्यामुळे सिडको एन-४ मधील जीर्ण विद्युतवाहिनी तुटून जमिनीवर पडली होती. दुरुस्तीसाठी साडेतीन हजारांवर ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे त्यांना नळाचे पाणी उशिरा मिळाले. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी दोन तास वेळ लागला. या परिसरात भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना होईल, अशी माहिती महावितरणचे गारखेडा परिसराचे सहायक अभियंता विनोद शेवणकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...