आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Chanting Of One Crore Mahamantras On The First Day; Establishment Of 'Navkar Connecting People' In The City, With 54 Families Participating In 11 Wards | Marathi News

निमित्त महावीर जयंतीचे:पहिल्या दिवशी एक कोटी महामंत्राचा जप; 11 प्रभागात 54 कुटुंबे सहभागी, ‘नवकार कनेक्टिंग पीपल’ची शहरात स्थापना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान महावीर जन्मकल्याणक समितीतर्फे यंदा ‘नवकार कनेक्टिंग पीपल’ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत सकल जैन समाजातर्फे शहरात प्रभागनिहाय २ ते १० एप्रिलदरम्यान भव्य महामंत्र जपानुष्ठान करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ११ प्रभागातील सकल जैन समाजातील ५४ कुटुंबीयांच्या ५ हजारांहून अधिक सदस्यांनी प्रत्येकी ५:१५ तासांत एक कोटीहून अधिक महामंत्र जप केला, अशी माहिती सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष रवी मुगदिया यांनी दिली.

मुगदिया म्हणाले, महामारीचा नायनाट व युद्ध संकट निवारणासाठी पुढील ९ दिवसांत नऊ कोटी महामंत्र जप होण्याची अपेक्षा आहे. त्यात सकल जैन समाजातील प्रत्येक परिवाराने सहभागी व्हावे. ज्या कुटुंबाला घरी जप करावयाचा आहे त्यांनी विभागप्रमुखांशी त्वरित संपर्क करून नोंद करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ३,६०० घरी जप करण्याचा मानस कमिटीतर्फे ठेवण्यात आला आहे. यशस्वितेसाठी रवी मुगदिया, संजय संचेती, अनिल संचती, अजित जैन, ललित पाटणी, नीलेश पहाडे, झुंबरलाल पगारिया, संजय सुराणा, सुनील राका, राजेश मुथा, विलास साहुजी, नीलेश सावलकर, मुकेश साहुजी, पारस बागरेचा, विनोद बोकडिया, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल, अभिजित हिरप परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...