आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांनो लक्ष द्या:आरटीई प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, 22 मे पर्यंत करता येईल प्रवेश निश्चिती

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून, ड्रॉ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु या मुदतीतही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न होवू शकलेली नाही. दिलेल्या मुदतीत केवळ 1965 जणांचे प्रवेश निश्चित झाले होते.

त्यामुळे उर्वरित प्रवेश निश्चित करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उद्या सोमवार दि. १५ मे रोजी संपत असतांना आता पुन्हा तिसऱ्यांदा प्रतिसाद फारसा मिळत नसल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळेे २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, ड्रॉ झाल्यापासून आता ही तिसऱ्यावेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

25 टक्के जागांवर प्रवेश

तर पालकांचा ठराविक नामांकित शाळेतच प्रवेश मिळावा या अट्टाहासामुळे मिळालेल्या जागेवरही प्रवेश निश्चित न केल्याने अर्ध्याहून अधिक जागा अद्यापही रिक्त असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास माेेफत शिक्षणाचा हक्क मिळावा. यासाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येेतो.

8 मे पर्यंत प्रवेश निश्चित

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता फेब्रुवारी महिन्यात अर्ज प्रक्रिया शाळांसाठी सुरु करण्यात आली होती. तर पालकांसाठी मार्च मध्ये नोंदणी प्रक्रिया करण्यात आली आणि प्रवेशासाठी ड्रॉ देखील करण्यात आला. १३ एप्रिल पासून पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 25 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आरटीईच्या पोर्टलवर येणाऱ्या अडचणी पाहता 8 मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना मुदत देण्यात आली होती.

मुदतवाढ मिळाली

ही मुदत सोमवार दि. 8 मे रोजी संपली. परंतु या दिलेल्या मुदतीतही प्रवेश पूर्ण न झाल्याने आता दुसऱ्यांदा मुदवाढ देण्यात आली होती. या नव्या तारखेनुसार 15 मे पर्यंत पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करायचे होती. ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या सूूचनापत्रात म्हटले आहे. मात्र ही मुदत देवूनही अर्धेच प्रवेश झाले आणि अर्धे बाकी असल्याने उद्या सोमवारी 15 मे रोजी मुदत संपण्यापूर्वीच तिसऱ्यांदा 22 मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

1704 जणांचे प्रवेश निश्चित

यंदा छत्रपती संभाजीनगरसाठी आरटीई प्रवेश पात्र शाळांची एकूण संख्या 545 आहे. प्रवेश क्षमता 4062 असून, यासाठी 20 हजार 779 अर्ज आले आहेत. त्यापैकी ड्रॉ मध्ये 4035 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी रविवारी सायंकाळ पर्यंत 2331 जणांचे प्रवेश निश्चित झाले . अजूनही 1704 जणांचे प्रवेश निश्चित होणे बाकी असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पात्र ठरूनही प्रवेश न घेतल्यास त्या पालकांचे पाल्य हे प्रवेश फेरीतून बाद होतील. याची पालकांनी नोंद घ्यावी.