आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कार्यकारिणी तशाच राहणार आहेत, मात्र या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.

या वेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शेख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋचा आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्ती केली.

बातम्या आणखी आहेत...