आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश:ज्योतिरादित्य शिंदे प्रमुख सूत्रधार, मविआ सरकार कोसळण्यापूर्वीच हालचाली सुरू झाल्या होत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांंना भाजपमध्ये आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली, अशा बातम्या आल्या आहेत. मात्र, याची सूत्रे थेट दिल्लीतून हलवली जात आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यात प्रमुख सूत्रधार आहेत. शिंदे यांनी प्रारंभिक बोलणी केल्यावरच पुढील पावले पडत आहेत, असेही चव्हाण यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेल्या प्रदेशस्तरीय पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वीच शिंदे यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कारण आता काँग्रेसच्या बळावर राज्यात सत्ता येणे कठीण असल्याचे चव्हाण यांना जाणवू लागले. त्यांना आता मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा नसली तरी किमान मंत्रीपद हवे आहे. म्हणून त्यांनी भाजपकडे मोहरा वळवला. हे कळताच दिल्लीतून शिंदे यांच्यावर खास जबाबदारी देण्यात आली. ज्योतिरादित्य यांचे वडिल माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडिल शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबध होते. तो धागा पकडूनच चर्चेला सुरुवात झाली. त्यापुढील जबाबदारी कृषीमंत्री सत्तार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारत बोलणीच्या तीन फेऱ्या केल्या आहेत. चव्हाण यांनी सोबत किमान १५ आमदार आणावेत, अशी भाजप श्रेष्ठींची अपेक्षा असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

...म्हणून हालचाली
अशोक चव्हाण यांची कारकीर्द गेल्या ३० वर्षांपासून अभ्यासणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे म्हणाले की, भाजप एका सर्वसमावेशक, सहकारावर पकड असणाऱ्या आणि शरद पवार विरोधक मराठा नेत्याचा शोध घेत आहे. तर चव्हाण यांना पुढील राजकीय भवितव्य निश्चित करून अडीच वर्षे मंत्रीपदाची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे या सर्व हालचाली सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...