आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी करून लाभार्थींची निवड:जैन समाजातील 68 गरजूंना स्वस्तात घर

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:चे घर हा आयुष्याला पूर्णत्व देणारा प्रसंग आहे. दीड वर्षापासून घर पाहत होतो. पण, बजेटमध्ये मनासारखे घर मिळत नव्हते. जितोच्या योजनेबद्दल कळले आणि माझे घराचे स्वप्न सत्यात उरतले, अशा भावना जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनकडून (जितो) घर मिळालेले प्रदीप वायकोस सांगत होते.

घराची ‘चावी’ हाती पडताच लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. जितो आंतरराष्ट्रीय संघटनेने आर्थिकदृष्ट्या कमकुवत, वंचित जैन बांधवांसाठी ‘जितो आवास योजना’ राबवली. यामध्ये नक्षत्रवाडी परिसरात ६८ फ्लॅट देण्यात आले. यामध्ये ५१ फ्लॅट १ बीएचके, १४ फ्लॅट २ बीएचके, ३ फ्लॅट ३ बीएचकेचे आहेत. आवास योजनेची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज आदी सोशल मीडियाचा उपयोग केला. त्यानुसार सुमारे २०० अर्ज संघटनेकडे प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र व्यक्तींना अत्यल्प दरात घर मिळवून दिले. त्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने मदत केली. लाभार्थींना हक्काच्या घराची ‘चावी’ जितो अ‍ॅपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा, उपाध्यक्ष पारस भंडारी, विजय भंडारी यांनी सोपवली.

बातम्या आणखी आहेत...