आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद कोरोना काळात मुंबईतील जे.जे हॉस्पीटल येथील चार हजार लोकांना जेवण पूरवण्यासह विविध जिल्ह्यात कंत्राट देण्याचे आमिष दाखवून हॉटेल नैवेद्यच्या मालाकाला 41 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात एमाआयडीसी सिडको पोलिसांनी मुख्य आरोपी महिला रजनी रविंद्र रानमारे हिला बेड्या ठोकल्या.या महिलेला 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. चरडे यांनी दिले.
गुन्हा दाखल
हॉटेल नैवेद्यचे भक्तबंधु रामचंद्र पाढी यांनी केलेल्या तक्रारीनुसार वरील दोघा आरोपींनी मुख्य आरोपी रजनी रानमारे हिच्या साथीने कोरोना काळात ओरंगाबाद, कोल्हापुर, नाशिक, पुणे, जालना, परभणी, सांगली, सातारा अशा विविध ठीकाणी तसेच मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल मधील चार हजार लोकांना जवेण पुरवण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला 41 लाख पाच हजार रुपयांना गंडा घातला. प्रकरणात एमाआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची कार जप्त
तब्बल सहा महिन्यांनी आरोपी संदिप बाबुलाल वाघ आणि स्वप्नील भरत नांद्रे या दोघांना पोलिसांनी 5 जून रोजी अटक केली होती. आरोपींच्या कोठडी दरम्यान पोलिसांनी संदीप वाघ वापरत असलेल्या कार (क्रं. एमएच-02-डीएन-7715) ही त्याची बहिण वैशाली सिरसाठ हिच्या नावे असून कारवर मागील व पुढील नंबर प्लेटवर राजमुद्रा तसेच महाराष्ट्र शासन अशी पाटी होती. अशा प्रकारे वाहनावर शासकीय प्रतिकांचा वापर करण्यात आल्याने ती कार जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान आरोपी रजनी रानमारे हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सहकारी वकील एस.एल. दास यांनी आरोपी रजनी हिने फसवणुकीसाठी वापरलेल्या आर.बी. केटरर्सची कागदपत्र जप्त करायची आहेत. आरोपी संदीप वाघ हा रजनीचा पती असल्याचे तसेच महाराष्ट्र मेडीकल डायरेक्टर असल्याचे सांगुन आरोपींनी बनवाट ओळखपत्र आणि कागदपत्रांआधारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यातील उर्वरित रक्कम हस्तगत करायची आहे.
मुख्य आरोपीला पोलिस कोठडी
आरोपी रजनी ही औरंगाबाद आणि मुंबई अशा दोन्ही ठीकाणी राहत होती, त्या ठीकाणची तपासणी करायची असल्याने आरोपी रजनीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. प्रकरणात एस.एल. दास यांना फिर्यादी पाढी यांचे अॅड. प्रसन्ना बर्जे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.